बिबवणे अलिमेंटेक : खाद्यपदार्थाची नाही, एक पोषकद्रव्यांची कंपनी!

देश विदेशात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्या मुख्यत्वे कृषी आणि खाद्य ह्या दोन विषयांवर काम करताना दिसतात. म्हणून त्या कंपन्या फूड किंवा ॲग्रो कंपन्या म्हणवल्या जातात. फूड, खाद्य किंवा अन्न म्हणजे म्हणजे ते जे आपले पोट भरते. मग पोषणाचे काय?? मुळात ह्या सर्व कंपन्यांना माहीत आहे की ते फक्त पोट भरणारे जिन्नस पुरवण्यासाठी व्यवसाय करत आहेत. त्यांना समाजाच्या पोषणाशी आणि आरोग्याशी काही संबंध नाही. म्हणूनच चटपटीत, मसालेदार, भडक रंगीबेरंगी पण कृत्रीम रंग आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरलेले पदार्थ जे खरेतर आरोग्याला उपकारक नाही, अपायकारकच आहेत ते सर्रास विकले जातात… ही आहे आपली परीचीत फूड इंडस्टी!

मी फूडटेक आणि केमिकल ह्यामधे बिटेक केलेले आहे आणि काही प्रतिथयश ब्रँडसोबत गेली ८-९ वर्षे काम केले आहे. असे काही प्रॉडक्ट जे तुम्ही आज सहजपणे खाताय ते कदाचीत मी डेव्हलप केलेले आहेत. पण मी जेव्हा ह्या फूड टेक्नॉलॉजीकडे प्रामाणीकपणे पाहते तेव्हा मला हे स्पष्ट जाणवते की ही अत्यंत चकचकीत आणि खोटी दुनिया असून केवळ अनारोग्य नाही तर एकूणच ह्याचे समाजावर दूरागामी परीणाम आहेत. त्यातील काही आजही दृश्य होत आहेत जसे की अकाली वार्ध्यक्य, स्थूलपणा, वंध्यत्व इ.

आपल्या दैनंदीन जीवनात आपण खात असलेल्या अनेक पदार्थांमधे कॅलरीज भरपूर आहे, चव-रंगाचे वैविध्य आहे पण पोषण गायाब आहे. उदा. आपल्या आहारातील सर्वात जास्त वापरला जाणार पदार्थ म्हणजे “पिठ”. चपाती, भाकरी, रोटी असो की नुडल्स .. ह्या सर्वांसाठी लागते पिठ. आणि तुमच्या विश्वास बसणार नाही पण आपल्या सूप पासून ते कुरकुरे पर्यत प्रत्येक गोष्टीत पिठ हे असतेच! आणि हे “पिठ” नाही मैदा किंवा स्टार्च असते ज्याचे शरीरावर अनंत दुष्परीणाम आहेत!

अशा अनेक गोष्टींचा विचार करून मी स्वत: अशी कंपनी चालू करते आहे जी केवळ चविष्ट नाही तर दर्जेदार आणि पौष्टीक उत्पादने मार्केटमधे आणेल. म्हणून माझी कंपनी फूड किंवा ॲग्रो कंपनी नाही तर ‘अलिमेंटेक’ कंपनी असणार आहे. कोकणातील निसर्गरम्य बिबवणे गावात मी ह्या स्टार्टअपला सुरूवात करते आहे – बिबवणे अलिमेंटेक प्रा. लि. : enough of food, lets talk aliment!

हा आहे परीचय कोकणातील एका महिलेच्या स्टार्टपचा : सौ. ममता राऊळ. आषाढीच्या परीवारात आम्ही एका नविन वेंचरला सुरूवात करत आहोत. मुख्य विषय असणार आहे “पिठ” आणि “तृणधान्ये” ह्यांचे पदार्थ जे पोषण देतील!